Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेड : सुप्रिया लाईफ सायन्सच्या ‘एचआर’ मॅनेजरला जीवे मारण्याची धमकी, पिरलोटेतील तरुणावर गुन्हा दाखल

banner 468x60

खेड औद्योगिक पट्ट्यातील लोटे परशुराम येथील ‘सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड’ कंपनीत अनधिकृतपणे प्रवेश करून कंपनीच्या एचआर मॅनेजरला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


७ मार्च रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास लोटे गावाची गावदेवीची पालखी परंपरेप्रमाणे सुप्रिया लाईफ सायन्स कंपनीच्या आवारात आली होती. यावेळी संशयित आरोपी शैलेश शिवाजी चाळके (रा. पिरलोटे दत्तवाडी, ता. खेड) याने कोणत्याही परवानगीशिवाय आणि अपराधाच्या उद्देशाने कंपनीच्या गेटमधून आत प्रवेश केला.


कंपनीच्या आवारात आल्यानंतर संशयिताने कंपनीचे एचआर मॅनेजर मनोज दिगंबर भामरे (वय ५०) यांना गाठले. त्यांना कसलाही विचार न करता अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. संशयित इतक्यावरच थांबला नाही, तर तो फिर्यादींच्या अंगावर धावून गेला आणि त्यांना ‘जीवे ठार मारण्याची’ धमकी दिली.


या घटनेनंतर मनोज भामरे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता आरोपी शैलेश चाळके याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३१, कलम ३३२ (सी), कलम ३५१ (३) व ३५२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत. औद्योगिक क्षेत्रात अशा प्रकारे अधिकाऱ्याला धमकी दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *