चिपळूण : अद्याप कोणाचाही मृतदेह सापडलेला नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका कोकण कट्टाचं आवाहन 

banner 468x60

चिपळूण मधील आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसने ही दोन मुले बुडाली तर इतर सहा जण बचावले आहेत.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर* 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

 या घटनेचीमाहिती चिपळूणचे डीवायएसपी राजेंद्र राजमाने यांनी घटनास्थळी पाहणी करून शोध कार्य सुरु केलं. 

अद्याप कोणाचाही मृतदेह सापडलेला नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका प्रशासनाचं आवाहन केलं आहे. 

रात्री उशिरा शोध कार्य थांबवण्यात आलं होतं. रात्री उशिरा पर्यंत दोन मुले सापडली नाहीत त्यामुळे एन डी आर एफ ची टीमपथकाला पाचारण करण्यात आलं आहे. 

चिपळूण मधील आठ मुले सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथेफिरण्यासाठी आली होती. 

त्यामध्ये इब्राहिम काजोरकर गोवळकोट,अब्रार हुसेन आंचरेकर गोवळकोट,फरहान हिदायत पिलपिलेखाटीकअली चिपळूण, अली नियाज सनगे रा बेबल मोहल्ला, जहिद हनीफ खान रा कोंढे चिपळूण, आरमान अजीज खान रा भेंडीनाका चिपळूण, आतीक इरफान बेबल 

 रा बेबल मोहल्ला,( बेपत्ता ), अब्दुल कादीर नोशाद लासने रा.जिव्हाळा सुपर बाझार यांचासमावेश होता. शिरगाव येथील वझर याठिकाणी ते पोहण्यासाठी थांबले यावेळी पावसाची एक मोठी सर आली आणि त्यातील सहाजण एका झोपडी खाली 

जाऊन थांबले तर आतिक बेबल व अब्दुल कादिर लसने यांनी डोहात उडी मारली सदरचा डोह हा ३० ते ४०फूट खोल असून त्याच्या डोहात सापडल्यावर कोणीही वाचत नाही त्यामुळे सदरची दोन मुले त्यात बुडाली असावी असा प्राथमिकअंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ आणि पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली तरचिपळूण डी वाय एस पी राजेंद्र राजमाने यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पाण्याचा डोह हा खूप खोल आहे व पाण्याचाप्रवाह मोठा असल्याने एनडीआरएफच्या पथक बोलावण्यात आलं आहे. 

करण्यात आली रात्री उशिरा पर्यंत शोध मोहीम सुरू होती. कुंभार्ली ग्रामपंचायत मार्फत रात्री त्याठिकाणी विजेची व्यवस्था करून शोध मोहीम राबविण्यात आली. 

आतीक बेबल आणि अब्दुलकादिर लसणे दोघेही इयत्ता दहावीत शिक्षण घेत होते. सदरच्या घटनेची माहिती मिळताच चिपळूण मधील अनेक बांधवांनी शिरगावपोलीस ठाण्यात भेट दिली अधिक तपास चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजित गडदे करीत आहेत.

 चिपळूणचेप्रांताधिकारी आकाश निगडे हे या सगळ्या प्रकरणी लक्ष ठेवून आहेत. आपत्कालीन विभागाच्या सगळ्या यंत्रणा येथे सज्ज ठेवण्यातआले आहेत. चिपळूण नगर परिषदेचे आपत्कालीन पथकही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

 आज सकाळी जिल्हा प्रशासनाकडूनमहाड येथील साळुंखे रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आला होते, हे पथक घटनास्थळी सकाळी दाखल झाल आहे. या रेस्टॉरंटकडून या डोहात कॅमेरे सोडण्याचे काम चालू आहे. तसेच थोड्याच वेळात कोस्टगार्ड यांचीही टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *