Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

लांजा : वाटण करण्याच्या किरकोळ कारणावरून मुलाने 70 वर्षीय आईवर केला जीवघेणा हल्ला, धावणेवाडीत धक्कादायक घटना; आरोपी ताब्यात

banner 468x60

स्वयंपाकासाठी आणलेल्या कोळंबीचे वाटण करण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मुलाने आपल्या ७० वर्षीय वृद्ध आईवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना लांजा तालुक्यातील धावणेवाडी येथे रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गणपत दिवाळे (वय ३५, रा. धावणेवाडी, ता. लांजा) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव असून सुनिता गणपत दिवाळे (वय ७०) असे जखमी आईचे नाव आहे. रविवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

संतोष दिवाळे याने बाजारातून कोळंबी आणली होती. आई सुनिता यांनी कोळंबी साफ केल्यानंतर मुलगा संतोषला मसाल्याचे वाटण करण्यास सांगितले. मात्र याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या संतोषने घरातील दगडी वरवंटा उचलून आईच्या डोक्यात मारहाण केली. तसेच शर्टाने तिचा गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

या घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष दिवाळे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

या घटनेमुळे लांजा परिसरात खळबळ उडाली असून किरकोळ कारणावरून मुलाने आईवर केलेल्या या जीवघेण्या हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लांजा पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *