Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेड : भरधाव कारने 3 वर्षांच्या चिमुरडीला उडवलं, मुक्कादम हायस्कूलसमोरील घटना

banner 468x60

खेड शहरातील मुक्कादम हायस्कूलसमोरील नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका भरधाव कारने ३ वर्षांच्या चिमुरडीला जोरदार धडक दिली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी खेड पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.


​मूळचे मध्यप्रदेशातील रहिवासी असलेले अफताब अहमद खान (वय ३२, सध्या रा. मदिना चौक, खेड) यांची पत्नी आणि ३ वर्षांची मुलगी पलक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास नदीकाठच्या रस्त्यावरून घरी परतत होत्या. यावेळी वळणावर समोरून येणाऱ्या कारने (क्र. एम.एच. ०५ डी.ई. ०४५८) लहानग्या पलकला जोरदार धडक दिली.


​धडक इतकी भीषण होती की पलक खाली पडली यामुळे पलकच्या पोटाला आणि नाकाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे गाडी चालवल्याने हा अपघात घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
​या अपघातानंतर १० दिवसांनी म्हणजेच ३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता खेड पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार चालक महेश अवधूत कारळे (रा. हेडगेवार कॉलनी, ब्राह्मण आळी, खेड) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा (रजि. नं. ४४/२०२६) नोंदवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *