चिपळूण हादरलं ! प्रेमविवाह, अपहरणनगरसेवकाच्या चालकाला गाडीत कोंबून जीवघेणी मारहाणचिपळूण येथील काँग्रेसचे नगरसेवक साजिद सरगुरोह यांचा चालक फैजान अब्दुलकादिर कर्जीकरला मारहाण, धमकी

banner 468x60

चिपळूण शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिपळूण नगर परिषदेतील नगरसेवक साजिद सरगुरोह यांच्या चालकाला सोमवारी (2 फेब्रुवारी) रात्री चौघांनी गाडीत कोंबून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. चिपळूणचे नगरसेवक साजिद सरगुरोह यांचा चालक फैजान अब्दुलकादिर कर्जीकर वय ३४ याचे अपहरण करून मारहाणी करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
प्रेमविवाहाच्या वादातून पत्नीच्या नातेवाईकांनीच हे कृत्य केल्याचा आरोप पीडित युवकाने केला आहे.

banner 728x90 banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार
फैजान कर्जीकर (रा. मजरेकाशी, चिपळूण) हे सोमवारी कामावर जात असताना मागून आलेल्या एका इनोव्हा कारमधील तिघांनी त्यांचे तोंड दाबून त्यांना जबरदस्तीने गाडीत कोंबले. अपहरणकर्त्यांनी गुहागर बायपास मार्गे गाडी वेगाने नेत फैजानला मारहाण करण्यास सुरुवात केली. मुंबई-गोवा महामार्गावरून वालोपे, कळंबस्ते आणि लोटे परिसरापर्यंत फिरवून फैजानला सतत मारहाण करण्यात आली. जखमी अवस्थेत फैजल कर्जीकर यांना कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी
ताबिश पेचकर राहणार गोवळकोट रोड चिपळूण समीर पेचकर राहणार गोवळकोट रोड चिपळूण मुस्कान दलवाई रा. गोवळकोट रोड चिपळूण आणि अमान नाडकर राहणार खेड यांच्याविरोधात (बी एन एस), 2023 115 (2)
(बी एन एस), 2023 140(3) (बी एन एस), 2023 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी फैजान कर्जीकर सध्या कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून या धक्कादायक प्रकारामुळे तो प्रचंड मानसिक दहशतीखाली आहे.

या घटनेमुळे चिपळूण शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रवासादरम्यान मुस्कान दलवाई या महिलेनेही गाडीत शिरून फैजानला शिवीगाळ करत मारहाण केली. डोळ्यावर प्रहार केल्यामुळे फैजानच्या डोळ्याला आणि कानाखाली गंभीर दुखापत झाली आहे. इतकेच नव्हे,तर आरोपींनी फैजानला आम्ही सांगतो तसे बोल अन्यथा जाळून टाकू अशी धमकी देत एक व्हिडिओ रेकॉर्ड केलाय

महेक अश्रफ दलवाई रा. गोवळकोट ता चिपळूण हिच्याशी माझे प्रेमसंबंध होते तिच्या घरातून विरोध असल्याने 07.01.2026 रोजी पळून जावून लग्न केले. त्यानंतर आम्ही दोघेही पोलीस ठाण्यात येऊन हजर झालेलो होतो . त्यानंतर आम्ही दोघेही आमच्या घरी मजरेकाशी येथे रहाण्यास गेलो. मी कुलूप खोलत असतानाच मागून एक इनोव्हा कार आली. त्यातून अमान नाडकर, तबिज पेचकर आणि समीर पेचकर हे गाडीतून उतरले. पेचकर बंधू हे माझ्या पत्नीचे दोन्ही मामा आहेत. ते गोवळकोट रोडला राहतात आणि अमान नाडकर हे खेडमध्ये राहतात. अमान नाडकरने माझं तोंड दाबलं आणि पेचकर बंधूंनी मला गाडीत टाकलं.

मला बोलायला जमत नव्हतं कारण माझं तोंड दाबलं होतं. त्यांनी गाडीतून नेलं. मला त्यांनी आळीपाळीने मारहाण केली. पुढे मुस्कान दलवाई नावाची व्यक्ती गाडीत बसली. त्या व्यक्तीने देखील मारहाण केली. लोटे बाहेर गाडी बाहेर पडली. तिथून पुढे जावून मला मारहाण केली. विशेष म्हणजे मला ट्रान्सफॉरमर जवळ नेवून वीजेचा शॉक देवून जाळून टाकण्याची धमकी दिली. त्यांनी मला अमानुषपणे मारहाण केली.ते व्हिडीओ बनवू इच्छित होते. त्यांना हवं ते व्हिडीओत बोलला नाहीस तर तुला ठार मारुन टाकेल, अशी अमान नाडकर याने धमकी दिली. त्यांनी माझ्याकडून जबरदस्ती व्हिडीओ बनवून घेतले की, मी माझ्या बायकोला जबरदस्ती पळवून आणलं, तिच्यावर अत्याचार केले. तिच्या आई-वडिलांना मारण्याची धमकी दिली. “माझी बायको मेहक दलवाई हिला 24 फेब्रुवारीला उपवास सोडून तिला तिच्या आजीच्या घरी सोडलं.

त्यानंतर रात्री अकरा वाजता आमच्या घरी गेलो. आम्ही प्रेम विवाह केला. या घटनेनंतर माझे शेठ नगरसेवक साजिद सरगुरोह हे माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते. त्यांनी मला खूप सपोर्ट केला. ते माझ्या कुटुंबासाठी खंबीरपणे उभे राहीले. मी पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी गेलो तेव्हा माझ्या तक्रारीनुसार तक्रार घेतली नाही. मला न्याय हवा आहे अस फैजान अब्दुलकादिर कर्जीकर याने म्हटलं आहे. दरम्यान चिपळूण पोलीस या प्रकरणी सविस्तर तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *