Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : जमिनीच्या वादातून हाणामारी; सहा जणांविरुद्ध गुन्हा

banner 468x60

दापोली तालुक्यातील कलानगर येथे जमिनीच्या हद्दीवरील कुंपण तोडल्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणी एकाच कुटुंबातील सहा जणांविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कलानगर येथील सर्व्हे क्रमांक २९ मधील जमिनीच्या वादातून ही घटना घडली. फिर्यादी भाग्यश्री भागोजी दाभोळकर यांच्या भावाच्या मालकीच्या जमिनीच्या पश्चिम बाजूस असलेले सिमेंट व तारेचे कुंपण आरोपींनी बेकायदा जमाव जमवून तोडल्याचा आरोप आहे. या नुकसानीबाबत जाब विचारण्यासाठी फिर्यादी गेल्या असता आरोपींकडून अश्लील शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर वाद चिघळून मारहाणीपर्यंत पोहोचल्याचे तक्रारीत नमूद आहे.

अंकुश पवार, अमर पवार आणि इंदू पवार यांनी फिर्यादीस हाताने मारहाण केल्याचे सांगण्यात आले आहे. सोडवणूक करण्यासाठी आलेल्या मजूर महिला तसेच फिर्यादीच्या वहिनीशीही आरोपींनी अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे.

घटनेची माहिती मिळताच फिर्यादीचे भाऊ अशोक इवलेकर, प्रकाश इवलेकर व इतर नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. मात्र आरोपींनी त्यांनाही जिवे मारण्याची धमकी देत अंगावर धावून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुख्य आरोपी दामोदर पवार यांनी अशोक इवलेकर यांच्या पाठीवर काठीने प्रहार केला, तर ऋतिक इवलेकर याला चावा घेऊन जखमी केल्याची नोंद आहे. या घटनेत अशोक इवलेकर व ऋतिक इवलेकर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचाही ठपका आरोपींवर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *