संगमेश्वर : स्टोन क्रशरवर उंचावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड येथील ‘युनायटेड स्टोन क्रशर’वर काम करत असताना एका कामगाराचा उंचावरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी घडली. दगडावर डोके आदळल्याने गंभीर दुखापत होऊन या कामगाराचा जागीच मृत्यू झाला.

banner 728x90 banner 728x90


मिळालेल्या माहितीनुसार, मयत कामगार राम स्वरुप रामअवतार सरोज (वय ५५ वर्ष, रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) हे मानसकोंड येथील युनायटेड स्टोन क्रशरवर कामाला होते. गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास क्रशरवर काम करत असताना त्यांचा तोल गेला आणि ते उंचावरून थेट खाली असलेल्या दगडांवर पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते बेशुद्ध पडले. क्रशरचे मालक आणि कॉन्ट्रॅक्टर जाहीद अजीज खान यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, संगमेश्वर येथे हलवले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना ‘मयत घोषित’ केले.


या घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. कॉन्ट्रॅक्टर जाहीद खान यांनी दिलेल्या खबरीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *