Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

खेड : लग्नासाठी आलेल्या विवाहितेचे सव्वा दोन लाखांचे दागिने चोरीला

banner 468x60

खेड तालुक्यातील कशेडी ओझरवाडी येथे भावाच्या लग्नासाठी आलेल्या एका विवाहितेचे तब्बल २ लाख ५८ हजार ७३६ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली विनायक सुर्वे (वय ५२, रा. घोणसेगाव–म्हसळा, सध्या रा. अंधेरी, मुंबई) यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रारीनुसार, ३ ते ४ फेब्रुवारी दरम्यान कशेडी–ओझरवाडी येथील विजय नारायण दरेकर यांच्या घरी ही चोरीची घटना घडली. वैशाली सुर्वे या आपल्या भाऊ विजय दरेकर यांच्या घरी त्यांच्या लग्नासाठी मुक्कामी आल्या होत्या. याच काळात अज्ञात चोरट्याने त्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारला.


चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये १ लाख ७५ हजार २४२ रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, १८ हजार ४४६ रुपये किमतीचे ब्रेसलेट, ६५ हजार रुपये किमतीचा नेकलेस आदी दागिन्यांचा समावेश आहे. दागिने चोरीस गेल्याचे लक्षात येताच वैशाली सुर्वे यांनी तातडीने खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *