Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

मंडणगड : तालुक्यात घंटा चोरीचा सत्र भैरीदेवी मंदिरावर चोरट्यांचा डल्ला

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील चोरीची घटना पुन्हा एकदा उघडकीस आली असून भैरीदेवी मंदिर येथे अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील शिरगाव येथील ग्रामदैवत भैरीदेवी मंदिरामध्ये चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अज्ञात चोरट्याने मंदिरातील पुरातन पितळी घंटा आणि मौल्यवान समई चोरून नेली असून याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिराचा मुख्य दरवाजा कुलूप न लावता केवळ कडी लावलेली असल्याचा फायदा घेत चोरट्याने ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.०० या कालावधीत मंदिरात प्रवेश केला.

स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मंदिरातील पितळी वस्तू लंपास करण्यात आल्या.या प्रकरणी शिरगाव पाटीलवाडी येथील रहिवासी मधुकर गंगाराम पाटील (वय ७१) यांनी १८ फेब्रुवारी २०२६ रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. चोरीस गेलेल्या साहित्याची एकूण किंमत सुमारे १५,००० रुपये असून त्यामध्ये पुढील वस्तूंचा समावेश आहे:


स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मंदिरातील पितळी वस्तू लंपास करण्यात आल्या.या प्रकरणी शिरगाव पाटीलवाडी येथील रहिवासी मधुकर गंगाराम पाटील (वय ७१) यांनी १८ फेब्रुवारी २०२६ रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. चोरीस गेलेल्या साहित्याची एकूण किंमत सुमारे १५,००० रुपये असून त्यामध्ये पुढील वस्तूंचा समावेश आहे:

मोठी पितळी घंटा – सुमारे १५ किलो वजन (किंमत ९,००० रुपये)
लहान पितळी घंटा – सुमारे ५ किलो वजन (किंमत ३,००० रुपये)

पुरातन पितळी समई – सुमारे ५ किलो वजन (किंमत ३,००० रुपये), अंदाजे ७० ते ८० वर्षे जुनी या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०५ (डी) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २२/२०२६ प्रमाणे नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *