दापोली तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, विविध गटांमध्ये चुरशीच्या लढतीनंतर मतदारांनी नवे नेतृत्व निवडले आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी जबाबदारी स्वीकारणाऱ्या नव्या प्रतिनिधींवर आता जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
केळशी जिल्हा परिषद गटातून नितीन दुर्गावळे यांनी विजय मिळवला असून, पंचायत समिती गण केळशीमधून संदीप चिखले तर जुईकर मोहल्ला गणातून उन्मेष राजे हे विजयी ठरले आहेत.
दाभोळ जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या साधना महाजन यांनी भाजपच्या स्मिता जावकर यांचा पराभव करत विजय मिळवला. या गटात चुरशीची लढत पाहायला मिळाली. पंचायत समिती गण बुरोंडीमधून अंकिता घुबडे तर दाभोळ गणातून नम्रता तोडणकर यांनी बाजी मारली.
हर्णे जिल्हा परिषद गटात ऐश्वर्या धाडवे विजयी ठरल्या आहेत. पंचायत समिती गण हर्णेमधून तुळसा जाधव आणि गिम्हवणे गणातून सुवर्णा खळे यांनी विजय मिळवला. या गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) प्रभावी ठरल्याचे दिसून आले.
पालगड जिल्हा परिषद गटातून मीनाक्षी शेडगे यांनी विजय संपादन केला. पंचायत समिती गण खेर्डीमधून सुचिता महाडिक तर पालगड गणातून राजेंद्र फणसे हे विजयी ठरले.
जालगाव जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे किशोर देसाई यांनी विजय मिळवला. पंचायत समिती गण टेटवलीमधून निलेश शेठ तर जालगाव गणातून श्रीराम उर्फ भाऊ ईदाते यांनी यश मिळवले. या गटात भाजपने आपली ताकद सिद्ध केली.
कोळबांद्रे जिल्हा परिषद गटातून प्रभाकर गोलंबडे विजयी ठरले. पंचायत समिती गण कोळबांद्रे येथून ममता शिंदे तर पांगरी तर्फे हवेली गणातून नरेश घरटकर यांनी विजय मिळवला.
निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला. विकासकामांना प्राधान्य देत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा संकल्प विजयी उमेदवारांनी व्यक्त केला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















