Breaking News
चिपळूण : सावर्डे रेल्वे स्थानकावर प्रवासी पादचारी उड्डाणपुलाला मंजुरी, प्रवासी संघटना व आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश मंडणगड : खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंडणगडमध्ये भव्य शैक्षणिक साहित्य वाटप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मंडणगड शहराध्यक्ष साईराज सावंत यांच्या पुढाकाराने भव्य कार्यक्रम दापोलीत पुन्हा खळबळ POCSOचा गंभीर गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलगी गर्भवती, जुलै महिन्यात दापोली तालुक्यात नोंद झालेला हा चौथा गुन्हा रत्नागिरी : महसूल विभागात मोठी खळबळ, उपजिल्हाधिकारी निलंबित, तर एकावर विभागीय चौकशीचे आदेश चिपळूणमध्ये जुगार आणि दारुबंदीविरोधात पोलिसांची धडक कारवाई, तिघांवर गुन्हे दाखल

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक मतदान गुहागरमध्ये 56.52 टक्के मतदान

Screenshot

banner 468x60

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात ३९.५२ टक्के मतदान झाले. आत्तापर्यंत सर्वाधिक गुहागर (४२.४३ टक्के) त्या खालोखाल रत्नागिरी (४०.१५ टक्के) तालुक्यात मतदान झाले.गुहागरमध्ये एकूण 56.52 टक्के मतदान झालं आहे.

banner 728x90


रत्नागिरी जिल्ह्यातील ५६ गट आणि ११२ गणांची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकासाठी शनिवारी सकाळी साडे वाजता मतदानाला प्रारंभ झाला. मात्र, सुरूवातीपासून मतदानाला संथ प्रतिसाद होता. अनेक मतदान केंदांवरील मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने प्रक्रिया विस्कळीत झाली. त्यामुळे मतदानाच्या आकडेवारीलाही विलंब होत गेला.


शनिवारी सकाळी ७:३० ते ९:३० या वेळेत ११.२४ टक्के मतदान झाले. ११:३० वाजेपर्यंत २६.४८ टक्के मतदान झाले. तर पुढच्या दोन तासांपर्यंत म्हणजे दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात ३९.५२ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात एकूण ११ लाख ७३ हजार ९०२ मतदार आहेत. यापैकी दुपारी दीड वाजेपर्यंत ४ लाख ६३ हजार ९०४ मतदारांनी आपला हक्क बजावला. यात महिला मतदारांची संख्या २,३७,७५३  तर पुरूष मतदारांची संख्या २, २६,१५० इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *