Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

गुहागर : ‘या’ गावातील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

banner 468x60

गुहागर तालुक्यातील काजुर्ली-खडपे वाडी येथील ग्रामस्थांच्या समस्या अनेक वर्षे जैसे थेच आहेत. यामुळे मूलभूत सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी आगामी जि. प. व पं. स. निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला आहे. खडपेवाडीमध्ये आजही घरापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नाही.

विद्यार्थ्यांना शाळेत जाणे, वृद्धांना दवाखान्यात पोहोचवणे आणि रुग्णांवर वेळेवर उपचार करणे हे सगळेच मोठे आव्हान बनले आहे. अलीकडेच आजारी वृद्धाला उपचारासाठी नेताना ग्रामस्थांना कावडीचा आधार घ्यावा लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळे या वाडीतील विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकाही घरापर्यंत पोहोचू शकत नाही.

परिणामी, रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे शारीरिक त्रासासोबत मानसिक तणावही सहन करावा लागत आहे. निवडणुकांच्या वेळी मतांसाठी हात जोडणारे पुढारी निवडणूक संपताच या वाडीकडे पाठ फिरवतात, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यासाठी अनेकवेळा ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर अर्ज, निवेदने व पाठपुरावा करण्यात आला. मात्र आजतागायत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची लगबग सुरू असताना आधी

वाडीत येऊन परिस्थिती पाहा, रस्त्यावर चालून दाखवा, मगच विकासाच्या गप्पा मारा, अशी थेट मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तात्काळ रस्ता सुविधा मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरू न झाल्यास मतदान प्रक्रियेत सहभागी न होण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. काजुर्ली खडपेवाडीतील हा प्रश्न केवळ एका गावापुरता मर्यादित नाही. गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागात आजही पायाभूत सुविधांची वानवा जाणवते. त्यामुळे आता तरी जबाबदार प्रशासन व लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाची दखल केव्हा घेणार, असा सवाल काजुर्ली खडपेवाडीतील ग्रामस्थांसह संपूर्ण तालुक्यातून उपस्थित केला जात आहे.



परिणामी, रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे शारीरिक त्रासासोबत मानसिक तणावही सहन करावा लागत आहे. निवडणुकांच्या वेळी मतांसाठी हात जोडणारे पुढारी निवडणूक संपताच या वाडीकडे पाठ फिरवतात, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यासाठी अनेकवेळा ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर अर्ज, निवेदने व पाठपुरावा करण्यात आला. मात्र आजतागायत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची लगबग सुरू असताना आधी वाडीत येऊन परिस्थिती पाहा, रस्त्यावर चालून दाखवा, मगच विकासाच्या गप्पा मारा, अशी थेट मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तात्काळ रस्ता सुविधा मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरू न झाल्यास मतदान प्रक्रियेत सहभागी न होण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. काजुर्ली खडपेवाडीतील हा प्रश्न केवळ एका गावापुरता मर्यादित नाही.

गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागात आजही पायाभूत सुविधांची वानवा जाणवते. त्यामुळे आता तरी जबाबदार प्रशासन व लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाची दखल केव्हा घेणार, असा सवाल काजुर्ली खडपेवाडीतील ग्रामस्थांसह संपूर्ण तालुक्यातून उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *