राज ठाकरे 8 जुलै रोजी चिपळूण, खेड,दापोली दौऱ्यावर

banner 468x60

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 8 जुलै रोजी चिपळूण दोऱ्यावर येणार आहेत. आठ जुलै रोजी सकाळच्या सत्रात ते खेड येथे तर दुपारनंतर दापोलीमध्ये जाणार असून दापोलीमध्ये त्यांच्या हस्ते शाखा कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

७ जुलै रोजी संध्याकाळी राज ठाकरे यांचे चिपळूण नगरीमध्ये स्वागत होईल. त्यानंतर ८ तारखेला सकाळी अकरा वाजता अतिथी सभागृह येथे बैठक होईल.

त्यानंतर दुपारचं भोजन घेऊन राज ठाकरे हे खेड मार्गे दापोलीकडे प्रयाण करतील. खेड नगरीत जल्लोषी वातावरणामध्ये स्वागत होईल
त्यानंतर दापोली येथे नवीन शाखा कार्यालयाचे उद्घाटन राज यांच्या हस्ते होईल आणि त्यानंतर राज ठाकरे मुंबईकडे प्रयाण करतील.

या दौऱ्याची संपूर्ण तयारी सरचिटणीस वैभव खेडेकर, जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष अविनाश सौदलकर, जिल्हा सचिव संतोष नलावडे, उपजिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड आणि सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी आणि संपर्क अध्यक्ष करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *