लांजा : लग्नास नकार दिल्याने तरुणीला जीवे मारण्याची धमकी

banner 468x60

राजापूर तालुक्यातील एका तरुणीला “माझ्याशी लग्न कर, अन्यथा तुला ठार मारीन” अशी धमकी देत नाहक त्रास दिल्याप्रकरणी लांजा तालुक्यातील वाकेड येथील भितळे याच्याविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीडित तरुणीने राजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ती व तिची आई ऑक्टोबर महिन्यात बसने पंढरपूर येथे प्रवास करत होत्या. त्या बसमधील प्रवाशांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला होता.

या ग्रुपमधून पीडित तरुणीचा मोबाईल क्रमांक मिळवून भितळे याने तिला फोन करून लग्नाचा प्रस्ताव दिला. मात्र, तरुणीने लग्नास स्पष्ट नकार दिला.


या नकाराचा राग मनात धरून आरोपीने पीडित तरुणी राहत असलेल्या ठिकाणी जाऊन “माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला ठार मारीन” अशी धमकी दिली. तसेच तिचा मोबाईल फोन फोडून टाकल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी राजापूर पोलिसांनी प्रशांत भितळे याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *