दापोली तालुक्यातील जालगाव येथे मालवाहू गाडी पलटली. या अपघातात तीनजण किरकोळ जखमी झाले तर एकजण गंभीर जखमी आहे. शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी मुसळधार पावसात ही घटना घडली.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
याबाबत अधिक माहिती अशी की, दापोलीकडून दाभोळकडे मालवाहू वाहन जात होते. या अपघातातील सर्व जखमींना दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एकाला अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.
जखमींमधील एक माटवण गावातील असून बाकी तिघेजण वडवली गावातील आहेत. अपघाताची माहिती मिळताच अनेक लोकांनी या वेळी मदत केली. या अपघाताचा तपास दापोली पोलीस करत आहेत. दोन दिवसापूर्वी दापोलीत भीषण अपघात झाला होता.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















