Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

गुहागर : बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला

banner 468x60

गुहागर तालुक्यातील कौंढर काळसूर बौद्धवाडी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील रहिवासी अजय अशोक जाधव वय ३५ वर्षे या तरुणाने आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.


​​मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजल्यापासून ते दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजेच्या दरम्यान घडली आहे. अजय जाधव याने आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये छताच्या लोखंडी बीमला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला.


​​या घटनेची खबर मयताचे चुलते चंद्रमणी गणपत जाधव यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. या माहितीनुसार, अजय जाधव हा घराच्या बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत मिळून आला. गुहागर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू क्रमांक ०२/२०२६ आणि बी.एन.एस.एस. (BNSS) १९४ प्रमाणे नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या तरुणाने आत्महत्या का केली याचं नेमक कारण कळू शकलं नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *