मंडणगड : भाजप मंडणगड तालुकाध्यक्ष प्रवीण कदम यांचा राजीनामा

banner 468x60

मंडणगड तालुक्यात भाजपच्या तालुकाध्यक्षपदी अवघ्या सहा महिन्यांपूर्वी नियुक्ती झालेल्या प्रवीण जनार्दन कदम यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी शनिवारी पक्षाच्या वरिष्ठांकडे सादर केला.


या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत कदम यांनी सांगितले की, आपला राजीनामा भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्याकडे देण्यात आला असून त्यांनी तो स्वीकारला आहे.

तसेच या निर्णयाची माहिती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे आणि माजी तालुकाध्यक्ष अप्पासाहेब मोरे यांनाही देण्यात आली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा महत्त्वाचा मानला जात असून, त्यामुळे मंडणगड तालुक्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *