रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली हरणे रोडवर झालेल्या अपघातात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी हाती आली आहे. उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती कळताच दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदमउपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
जखमेवर योग्य उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाला आमदार योगेश कदम यांनीसूचना दिल्या आहेत. आमदार योगेश कदम येणे मृत व जखमी व्यक्तीच्या कुटुंबीयांचे संतुलन करत धीर दिला. मृत नातेवाईकांच्याकुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
मरियम गौफिक काझी (वय ६ वर्षे), स्वरा संदेश कदम (वय ८ वर्षे), संदेश कदम (वय ५५ वर्षे) आणि फराह तौफिक काझी (वय २७ वर्षे) सर्व राहणार अडखळ, अनिल उर्फ बॉबी सारंग (वय ४५ वर्षे रा. हर्णै चालक) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या अपघात रात्री उशीरा आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मिरा महेश बोरकर (वय २२ वर्षे) पाडले, वंदना चोगले (वय ३८ वर्षे) पाजपंढरी दापोली येथील भागवत हॉस्पिटलमध्ये उपचार दरम्यान मृत्यू झाला शरय्या शिरगावकर राहणार अडखळ डेरवण येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे.
जिल्हा पुन्हा एकदा एका भीषण अपघातानं हादरला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार अपघाताच्या घटनाघडल्या आहेत. दापोली हर्णै राज्य मार्गावर आसूद येथे रविवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. ट्रक व मॅजिकप्रवासी रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघात काहीजण जखमी झाले आहेत.
ट्रक आणि मॅजिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा प्रवाशांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याचंसमोर आलं आहे. या अपघातात हर्णै येथील प्रवासी मॅजिक गाडीचालक अनिल उर्फ बॉबी सारंग यांचाही मृत्यू झाला आहे. याअपघातामुळे मोठी खळबळ उडाली असून प्रथमदर्शनी ट्रक चालकाच्या चुकीमुळे चार जणांना जीव गमवावा लागल्याचा अंदाजआहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*