Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

चिपळूण : गाडीसमोर दुचाकी आडवी लावून चालकास मारहाण

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील सावर्डे वहाळफाटा येथे चारचाकी गाडीसमोर दुचाकी आडवी लावून वाहनचालकास शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना २५ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास तरंग बिअर शॉपीसमोर घडली.

या प्रकरणी दोन सख्ख्या भावांविरोधात सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विनायक अनंत कदम (वय ४४, रा. खांडोत्री देवूळवाडी, ता. चिपळूण) यांनी फिर्याद दिली आहे. जयेश जनार्दन भागडे (वय ३५) व किरण जनार्दन भागडे (वय ३०, दोघे रा. आबिटगाव दत्तवाडी, ता. चिपळूण) अशी आरोपींची नावे आहेत.


फिर्यादी कदम हे २५ डिसेंबर रोजी रात्री आपल्या वॅगनआर कारने मुंबई–गोवा महामार्गावरून खांडोत्री येथील घरी जात असताना सावर्डे वहाळफाटा येथे आले. त्यावेळी आरोपींनी चालत्या गाडीसमोर दुचाकी आडवी लावली. जयेश भागडे याने कदम यांना गाडीतून खाली उतरवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.


दरम्यान, किरण भागडे याने कदम यांच्या मानेच्या डाव्या बाजूला जोरात हाताने फटका मारल्याने ते खाली पडले. त्यानंतर दोघांनी संगनमत करून कदम यांना मारहाण केली तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या घटनेनंतर २६ डिसेंबर रोजी सावर्डे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम १२६(२), ११५(२), ३५२, ३(५) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सावर्डे पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *