Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

राजापूर : तालुक्यातील अनेक गावांत अनोळखी व्यक्ती, फेरीवाले, भंगारवाल्यांना प्रवेशबंदी

banner 468x60

राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील महिलेचा खून, कोळवणखडी येथील घरफोडी आणि अनेक दिवस उलटूनही आरोपी न सापडणे यांसारख्या घटनांमुळे तालुक्याच्या पूर्व भागात भीतीचे वातावरण आहे.

banner 728x90 banner 728x90

या परिसरातील अनेक ग्रामपंचायतींनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून गावामध्ये येणारे फेरीवाले, भंगारवाले, भोंदू बाबा यासह अनोळखी व्यक्तींना गावामध्ये प्रवेश करण्यास मज्जाव केला आहे. जर अशा व्यक्ती गावात आढळल्यास तत्काळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल, असा इशारा देणारा फलक बुधवारी गावांच्या वेशीवर लावण्यात आला आहे.

कोरोना काळात सामाजिक अंतर राखण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या काळात गावात कोणीही प्रवेश करू नये, यासाठी गावांच्या वेशीवर प्रवेश बंदीचे फलक लावण्यात आले होते. आता तशी स्थिती नसली तरी चोऱ्या, खून यांसारख्या प्रकारांमुळे धास्तावलेल्या ग्रामस्थांनी अनोळखी लोकांना गावात प्रवेश नाकारला आहे. रायपाटण येथील वैशाली शेट्ये या महिलेचा खून होऊन दोन महिने झाले आहेत.

कोळवणखडी येथे घरफोडीची घटना घडली आहे. याव्यतिरिक्त तालुक्याच्या काही भागात घरफोड्यांचे प्रकार घडले आहेत. या वाढत्या गुन्हेगारीमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे राजापूर तालुक्याच्या पूर्व परिसरातील येळवण, कोळवण खडी, रायपाटण, तळवडे यासह अनेक गावांत तेथील ग्रामपंचायतींनी गावात प्रवेश करणाऱ्या अनोळखी व्यक्ती, फेरीवाले, भंगारवाले, भोंदू बाबा यांना गावात प्रवेश करण्यास सक्त मनाई करणारे फलक लावले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *