तालुक्यातील टेटवली येथे चक्क गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
दापोली पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ही लागवड उघड केली असून, या प्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली तालुक्यातील टेटवली येथील सरोदेवाडी येथे गुरुवारी (दि. 15) रात्रीच्या सुमारास दापोली पोलिसांनी छापा मारला. त्यावेळी त्यांना सीताबाई रामचंद्र इदाते यांच्या घराच्या मागील बाजूला कुडाच्या कुंपणामध्ये गांजा सदृश्य रोपांची झाडे आढळली.
दापोली पोलिसांनी ही 11 रोपे जप्त करून त्याचे वजन केले असता ते १ किलो ३४३ ग्रॅम इतके भरले. त्याची किंमत ३ हजार ५५० रुपये इतकी आहे.
महिला पोलिस कॉन्स्टेबल सोनाली गावडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित सीताबाई इदाते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाोलिस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















