Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली : 12 बोर रायफल आणि 15 जिवंत काडतुसांसह शिकारी टोळी जेरबंद

banner 468x60

दापोली येथील जंगलातील वन्यजीवी प्राण्यांची अवैध शिकार करण्यासाठी आलेल्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली.

banner 728x90 banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

त्यांच्याकडून 12 बोर रायफल व १५ जिवंत काडतुसांसह टोयोटा क्वालिस वाहन असा एकूण 3 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अक्षय बळिराम नागळकर (रा. घोडबंदर रोड, भाईंदर ठाणे, योगेश विठ्ठल तुरे (रा. टाळसुरे, दापोली), सचिन कचेर पाटील, (रा. दापोडे भिवंडी, ठाणे ),करण उर्फ बंटी शिवाजी ठाकूर (रा. भिवंडी ठाकराचा पाडा, ठाणे ) अशी अटक करण्यात आलेल्या 4 जणांची नावे आहेत.


18 जून रोजी मध्यरात्री 12.वा पासून ते सकाळी 5.वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक रत्नागिरी धनंजय कुलकर्णी, व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली “ऑल आउट ऑपरेशन” राबविण्यात आले.

ज्यामध्ये प्रामुख्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार, हॉटेल्स, लॉज, संशयित वाहने इत्यादि रत्नागिरी पोलीसांमार्फत चेक करण्यात आली. या दरम्यानेच, खेड उपविभागामध्ये नाकाबंदी तपासणी व गस्त घालत असताना दापोली पोलीस ठाणे हद्दीमध्ये वन्यजिवि प्राण्यांची अवैध शिकार करणारी टोळी वाहनासहीत फिरत असल्याची गोपनीय माहिती खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांना मिळाली.

माहिती मिळताच राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली एक पोलीस पथक तयार करण्यात आले ज्यामध्ये दोन पंचांचा देखील समावेश करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *