दापोलीत रमी जुगाराचा खेळ खेळत असताना दापोली पोलिसांनी छापा मारून रोख 69 हजार 300 रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केलं आहे.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार दापोली शहरातील डम्पिंग ग्राउंडच्या समोर असलेल्या बुटाला यांच्या घरात जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यावर
11 जूनला सायंकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी मुणगेकर, पोलिस निरीक्षक विवेक अहिरे, दापोली पोलिस ठाण्यातील कर्मचारी यांनी छापा ठाकला.
बुटाला यांच्या घराच्या पडवीत 6 जण रमी पत्यांचा जुगार खेळत असताना आढळून आले. त्याची झडती घेऊन त्यांच्याकडील 69 हजार 300 रोख रक्कम जप्त करण्यात आलीय.
या प्रकरणी संशयित नासीर महम्मद मनीयार (रा. दापोली), साजिद उस्मान मनीयार (दापोली), अनिल देविदास बीडला (दाभोळ), जमीर हसन बटकुले ( खोंडा), नजीर युनिस पेडेकर (सातेरेतर्फे नातू), राजेंद्र दत्तात्रय गोरीवले (टाळसुरे) यांच्या विरोधात राजेंद्र नलवडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक तपास अशोक गायकवाड करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















