राजापूर : जामदा नदीवरील पूल कोसळूनचार वर्षे झाली तरी दुर्लक्षच

banner 468x60

राजापूर तालुक्यातील हातदे व मिळंद गावांना जोडणारा जामदा नदीवरील लोखंडी पूल चार वर्षांपूर्वी मोठ्या महापुरामध्ये वाहून गेल्यामुळे परिसरातील लोकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत आहे. तरी तातडीने त्याठिकाणी नव्याने साकव उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत असून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

banner 728x90


राजापूर तालुक्यातील हातदे व मिळंद गावांना जोडण्यासाठी वीस वर्षांपूर्वी शासनाच्या साकव कार्यक्रमांतर्गत लोखंडी साकव बांधण्यात आला होता. त्यामुळे पावसाळ्यामध्ये होणारी अडचण दूर झाली होती. तसेच या साकवामुळे दोन्ही गावांतील नागरिक एकदम जवळ आले होते आणि दळणवळणाच्या दृष्टीने फारच सोयीस्कर झाले होते. मात्र, जुलै २०२१ मध्ये जामदा नदीला आलेल्या महापुरामध्ये हा साकव वाहून गेल्यामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता.
गेल्या पावसाळ्यामध्ये या दोन्ही गावांचा संपर्क तुटत

असल्यामुळे लोकांना ये-जा करणे फारच कठीण बनले होते. यामुळे वयोवृद्ध, आजारी माणसे, शाळा, कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि पाचाल येथे मुख्य बाजारपेठ असून हातदे येथील नागरिकांना तेथे जाण्यास अडचण होत आहे. नागरिकांना सहा किलोमीटर वळसा मारून जावे लागत असून पैसा आणि वेळ दोन्ही वाया जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *