Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : हातखंबा पीर येथे सलग दुसऱ्या दिवशी अपघात

banner 468x60

रत्नागिरी हातखंबा येथे महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला. हातखंबा पीर येथे उतारात डंपर उलटून अपघात झाला. या अपघातात कोणी जखमी झाले नसले तरी काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.

रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा डंपर असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. हातखंबा पीर येथील तीव्र उतारावर हा अपघात होऊन डंपर पलटी झाला. स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेत मदतकार्य केले. पोलिसांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *