दापोली : महिलेला धमकी देऊन जमीन बळकावळ्याचा आरोप, धमकी प्रकरणी दिलावर टेटवलकर, गफूर टेटवलकर, दिलावर कावळेकर तिघांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Screenshot

banner 468x60

चंद्रशेखर जोशी, दापोली
दापोली तालुक्यातील टेटवली बौद्धवाडी येथील एका महिलेच्या मालकीच्या जागेवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत तिला धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरोधात अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे टेटवली परिसरात खळबळ उडाली आहे.

banner 728x90 banner 728x90

जागेवर अनधिकृतपणे अंगणवाडीची व्यवस्था?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही सर्वे क्रमांक 93/2(क) मधील एका इमारतीची मालक आहे. या इमारतीत संशयित व्यक्ती उर्दू अंगणवाडीतील मुलांना बसवीत असल्याचे निदर्शनास आले.

याला पीडित महिलेने तीव्र हरकत घेतली. महिलेने हरकत व्यक्त केल्यानंतरही संशयितांनी तिच्या मालकी हक्काकडे दुर्लक्ष करून त्या इमारतीची डागडुजीचे काम सुरू केले. तक्रारीनुसार, या दुरुस्तीच्या कामामागे महिलेची जमीन हडप करण्याचा हेतू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महिलेची विचारणा – संशयितांची धमकी

महिलेने जागेवर सुरू असलेल्या कामाबाबत विचारणा केली असता तिघा संशयितांनी तिला धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हे संशयित पुढीलप्रमाणे —
•दिलावर इब्राहिम टेटवलकर
•गफूर मोहम्मद टेटवलकर
•दिलावर शेख हुसेन कावळेकर

पीडितेच्या तक्रारीनुसार, या तिघांनी तिला “तुम्हाला काय करायचे ते करा” असे म्हणून धमकी दिली. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत धमकी देणे हा गंभीर गुन्हा मानला जातो.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महिलेने घडलेली घटना तात्काळ दापोली पोलीस ठाण्यात कळविली. तिच्या तक्रारीवरून तिघांविरोधात
•आत्याचार प्रतिबंधक कायदा,
•तसेच इतर संबंधित कलमांनुसार
गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस करत आहेत. मालकी हक्काचे दस्तऐवज, बांधकाम स्थिती, घेण्यात आलेल्या दुरुस्त्यांची माहिती यासह सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
या घटनेमुळे टेटवली परिसरात नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. पीडित महिलेला न्याय मिळावा आणि योग्य तो निर्णय व्हावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *