राजापूरात नगराध्यक्ष पदासाठी ३ तरनगरसेवक पदासाठी ५१ उमेदवार रिंगणात

banner 468x60

राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या एक आणि नगरसेवक पदाच्या सात अशा एकूण ८ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदाचे ३ आणि नगरसेवक पदाचे ५१ असे ५४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.


राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी ४ तर नगरसेवक पदाच्या २० जागांसाठी ५८ असे एकूण ६२ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी एकूण आठ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.

यामध्ये शीतल सुनील पटेल यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. तसेच नगरसेवक पदासाठी दाखल केलेल्या अर्जामधून शाहबाज सिराज खलिफे, सोनल रमेश केळकर, आदित्य रमाकांत बाकाळकर, संजय मनोहर पवार, सुशांत विनायक पवार, आदिल इक्बाल ठाकूर, कल्याणी कल्याण रहाटे या सात जणांनी अर्ज मागे घेतले आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी ज्योती सुनील खटावकर, हुस्नबानू निजामुद्दीन खलिफे आणि श्रुती श्रीकांत ताम्हनकर यांच्यात लढत होणार आहे. एकूण १० प्रभागांच्या २० जागांमध्ये ११ ठिकाणी तिरंगी तर ९ ठिकाणी दुरंगी लढत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *