Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

मंडणगड : कोकणात नैसर्गिक शेती व बांबू वनशेतीवर हरित कौशल्य विकास कार्यशाळा

banner 468x60

कोकणातील वेरल आणि पालवनी (ता. मंडणगड) येथे NYCC आणि ट्रीपल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक शेती व बांबू आधारित वनशेतीवरील एक दिवसीय हरित कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला YFN इंडिया फाउंडेशन तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचे सहकार्य लाभले.

banner 728x90 banner 728x90


कार्यशाळेत वाढत्या शेतीखर्चाच्या समस्येवर उपाय म्हणून नैसर्गिक शेतीचा प्रसार आणि कोकणासाठी भावी रोजगारनिर्मितीचा पर्याय म्हणून बांबू आधारित वनशेती यावर सविस्तर चर्चा झाली. नैसर्गिक शेतकरी उत्पादक संघ, स्वयंसहायता गट, तज्ज्ञ आणि स्थानिक युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.


ग्रामीण कोकणातील वाढत्या स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर शाश्वत उत्पादन व स्थिर रोजगारासाठी बांबू वनशेती आणि नैसर्गिक शेती हे प्रभावी पर्याय ठरू शकतात, असा ठोस निष्कर्ष कार्यशाळेत मांडण्यात आला. सध्या गावांमध्ये ज्येष्ठ नागरिक व युवा महिलांची संख्या मोठी असून उपजीविकेच्या संधींची टंचाई भासत आहे. या परिस्थितीत हरित कौशल्याधारित उद्योजकता महत्त्वाची ठरणार असल्याचे मत व्यक्त झाले.


पुढील टप्प्यात डिसेंबर महिन्यात माती परीक्षण मेळावा आणि बांबू लागवड नियोजनासाठी भूमी सर्वेक्षण आयोजित केले जाणार आहे. तसेच वडवली येथील भावेश कारेकर यांच्या ‘बांबू व्हिलेज इंडिया’ प्रकल्पासाठी शेतकरी सहल आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली.


या उपक्रमात NYCC चे शुभम गुरव (क्लायमेट चॅम्पियन), ट्रीपल चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक भावेश कारेकर, सहकारी संगीत बने, भरारी उद्योगजिका गटाच्या अध्यक्षा किमया जोशी, YFN इंडिया फाउंडेशनचे अक्षय लोहार, तसेच कृषि विभागातील स्नेहल सतीश गुजर आणि नेहा निलेश रासळ (कृषी सखी) यांनी विशेष योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *