लांजा : जागेच्या वादातून चुलत भावामध्ये हाणामारी

banner 468x60

लांजा शहरातील वैभव वसाहत येथे दोन सख्ख्या चुलत भावांमध्ये जमीन जागेच्या वादातून शिवीगाळ, हाणामारीची घटना बुधवारी (ता. १२) रात्री घडली.

या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, पोलिसांनी एकूण तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत ज्ञानदा पृथ्वीराज मोरे (वय २९) यांनी लांजा पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती आणि चुलत दीर यांच्यामध्ये वडिलोपार्जित जमिनीच्या कारणावरून वाद सुरू आहे. १२ नोव्हेंबरला ज्ञानदा मोरे घरी होत्या.

या वेळी सख्खे चुलत दीर राजीव मोरे आणि सासरे अनिल मोरे यांनी तिच्या घरी जाऊन तुझा नवरा आमच्याशी गोठ्यावरून भांडत होता, असे बोलून दीर राजीव मोरे याने तिला शिवीगाळ करून हातावर मारहाण केली. त्यांचे पती पृथ्वीराज मोरे हे पत्नीला सोडवण्यासाठी तो गेला असता अनिल मोरे यांनी त्याला लाकडी फळीने मारहाण केली. त्यानुसार पोलिसांनी राजीव अनिल मोरे आणि अनिल लहू मोरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

राजीव अनिल मोरे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, पृथ्वीराज मोरे यांच्या वडिलांविरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्याची नोटीस त्यांना प्राप्त झाली आहे. त्याचा पृथ्वीराज याला राग आला. त्याने राजीव मोरे यांच्या आई-वडिलांना शिवीगाळ करून थोपटाने मारहाण केली. पोलिसांनी पृथ्वीराज मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *