Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली : योगेश कदमांविरोधात भाजप आक्रमक, माजी आमदारासह 39 पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात नगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे.

खेड नगरपरिषदेसाठी भाजप-शिवसेना युती जाहीर झाली असली तरी दापोली भाजप पदाधिकाऱ्यांनी या युतीला विरोध दर्शवला आहे. कोकणात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी उडाली आहे.

banner 728x90 banner 728x90

भाजप पदाधिकाऱ्यांनी योगेश कदम यांच्या जागा वाटप फॉर्म्युल्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत पत्राद्वारे वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.

शिवसेना आमदार योगेश कदम यांच्या विरोधात भाजप पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगर परिषदेत सन्मानजनक जागा वाटप न झाल्याच्या कारणास्तव भाजपच्या माजी आमदार, जिल्हाध्यक्षांसह ३९ पदाधिकाऱ्यांनी थेट राजीनाम्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे यांना पत्र लिहून पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा इशारा दिला.

खेड नगरपरिषद स्वबळावर जिंकण्याची शक्यता असताना शिवसेना आमदार योगेश कदम यांनी केवळ तीनच जागा सोडल्या आहेत. जे भाजपवर अन्याय करणारा निर्णय असल्याचे म्हणत माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्यासह जिल्ह्याध्यक्ष केदार साठे यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आणि नितेश राणे यांना पत्र लिहले आहे. तसेच या पत्रामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचेही म्हटलं आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी भाजपवासी झालेल्या वैभव खेडेकर यांच्या पत्त्यावर पडल्याची चर्चा सुरू आहे. नुकताच खेडेकर यांनी बायकोच्या (वैभवी) नगराध्यक्षपदासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांनी नगराध्यक्षपदावर दावाच करत पत्नी वैभवी खेडेकर यांचे नगराध्यक्ष अशा आशयाचे व्हॉट्सअॅप स्टेटसही ठेवले होते. तसेच ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. यामुळेच येथे महायुतीतील बेबनाव अल्याचे समोर आले होते.

शिवसेनेचे खेडचे आमदार योगेश कदम हे मीडिया समोर येऊन माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि वैभव खेडेकर यांच्याविरोधात अपमानजनक बोलत असल्याचा पत्रात आरोप करण्यात आला आहे. खेड नगरपरिषद स्वबळावर जिंकण्याची शक्यता असताना केवळ तीनच जागा मिळणे अत्यंत चुकीचे आहे असे मत भाजप नेत्यांनी व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्यासह बावनकुळे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये पदाधिकाऱ्यांची तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

अशा प्रकारच्या जागा वाटपामुळे पक्षाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता असल्याचे मत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. केंद्रात आणि राज्यात सत्ता तुमची आणि भांडी घासा आमची असे म्हणत शिवसेनेच्या शिंदे गटाचे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी गावागावात जाऊन हिणवतात असे भाजपच्या कार्यकर्त्यांनी पत्रात म्हटले आहे. खेड नगर परिषदेचे जागावाटप करताना पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याची देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केली.

भारतीय जनता पार्टी मध्ये दाखल झालेले वैभव खेडेकर यांनी या पूर्वी खेड पालिकेचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यांचा अनुभव पक्षाला या निवडणुकीत उपयोगी पडू शकला असता मात्र भाजप महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करताना अनुपस्थित होते. खेडेकर यांनी निवडणूक जाहीर होताच त्यांची पत्नी वैभवी खेडेकर यांना उमेदवार म्हणून रिंगणात उतरवण्याची तयारी केली होती. मात्र खेडेकर यांच्या रणनीतीला वरिष्ठांनी ब्रेक लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत स्वतःच्या पक्षाचे चिन्ह व एबीपl फॉर्म बाजूला ठेवणारे वैभव खेडेकर यावेळी देखील पालिकेच्या राजकारणासाठी कोणती रणनीती आखतात याची चर्चा शहरात सुरू आहे.

  1. खेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत वाद कशावरून पेटला आहे?
    → भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपावरून वाद निर्माण झाला आहे.
  2. कोणत्या नेत्यांनी युतीला विरोध केला आहे?
    → माजी आमदार, जिल्हाध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह भाजप पदाधिकाऱ्यांनी युतीला विरोध केला आहे.
  3. योगेश कदम यांच्यावर कोणते आरोप करण्यात आले आहेत?
    → जागा वाटपाचा प्रस्ताव पक्षपाती असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
  4. या प्रकरणात वैभव खेडेकर यांचा काय उल्लेख आहे?
    → भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेल्या वैभव खेडेकर यांना या घडामोडींमुळे दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.
  5. भाजप नेत्यांनी पुढील काय पाऊल उचलण्याची शक्यता आहे?
    → जागा वाटप सुधारले नाही तर राजीनामा देण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी मीडियासमोर बोलणे तातडीने थांबवावे. जागावाटप न्याय आणि सन्मानजनक व्हावे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे मागणी केली. खेड नगर परिषदेमध्ये एकूण २० जागा आहेत. जागा वाटपामध्ये १७ जागा शिवसेना तर ३ जागा भाजपला असा महायुतीचा प्रस्ताव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *