रत्नागिरी : जिल्हा पोलीसांची धडक कारवाईमिरजोळेत गावठी दारू निर्मितीवर पोलिसांचा छापा, दोन जण ताब्यात

Screenshot

banner 468x60

रत्नागिरी मिरजोळे, पाटीलवाडी (ता. रत्नागिरी) येथे रत्नागिरी पोलीसांनी नदीकिनारी छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचा प्रकार उघडकीस आणला आहे.

banner 728x90 banner 728x90

या कारवाईत पोलिसांनी ९०० लिटर गुळ-नवसागर मिश्रित कुजके रसायन आणि ४० लिटर हातभट्टी दारू असा एकूण ₹६७,८००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.


या प्रकरणी दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी. निलेश माईनकर (सो. रत्नागिरी) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील व त्यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *