Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी हल्ला प्रकरण : तरुणावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या संशयित अंकुश मांडवकर ला 5 दिवसांची पोलीस कोठडी

Screenshot

banner 468x60

रत्नागिरी शहरातील मांडवी भुतेनाका येथे दुचाकीवरील तरुणावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या संशयिताला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अंकुश मांडवकर (रा. भुतेनाका, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव असून, त्याला शहर पोलिसांनी अटक केली आहे.


ही घटना सोमवारी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास घडली. अंकुश हा कोयता घेऊन भुतेनाका परिसरात आला होता. यावेळी त्याने दुचाकीवरून जात असलेल्या अरमान इनामदार (वय 29, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) याच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात अरमान जखमी झाला.


या प्रकरणी शहर पोलिसांनी अंकुशविरुद्ध खून करण्याचा प्रयत्न या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल केला असून, मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
अंकुशने हल्ला कोणत्या कारणाने केला, तसेच हल्ल्यासाठी वापरलेला कोयता त्याने कुठून आणला, याबाबतचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *