Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

राजापूर : जमिनीच्या वादातून महिलेला मारहाण

banner 468x60

कौटुंबिक जमीन आणि सामाईक घरावरून सुरू असलेल्या जुन्या वादामुळे राजापूर तालुक्यातील डोंगर दत्तवाडी येथे एक गंभीर घटना घडली आहे. सख्या जावेने रागाच्या भरात दुसऱ्या जावेच्या डोक्यात सोललेला नारळ मारून दुखापत केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एका महिलेविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90


ही दुखापतीची घटना दिनांक ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता डोंगर दत्तवाडी, ता. राजापूर येथे घडली. याप्रकरणी संजिवनी संतोष कामतेकर (वय ४७, रा. डोंगर दत्तवाडी) यांनी राजापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी संजिवनी कामतेकर आणि आरोपी महिला या दोघी नात्याने सख्ख्या जाऊ आहेत आणि त्यांचे जमीन-जुमले तसेच सामाईक घरावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत.


घटनेच्या दिवशी फिर्यादी संजिवनी कामतेकर या त्यांच्या शेतातील काढलेले नाचणीचे गोडण सडण्यासाठी जुन्या घरातील ‘व्हाईनावर’ घेऊन गेल्या होत्या. त्याचवेळी आरोपी महिला तिथे उपस्थित होती. संजिवनी यांना पाहताच आरोपी महिलेने त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि ‘तू इथे कशाला आलीस, तुझ्या घरात जा’ असे बोलली.


यावर फिर्यादीने ‘तू मला शिव्या कशाला देतेस?’ असे विचारले असता आरोपी महिलेला अधिक राग आला. तिने रागाच्या भरात घरातील खोलीत धाव घेतली आणि तेथे असलेला सोललेला नारळ हातात घेऊन येऊन फिर्यादी संजिवनी कामतेकर यांच्या डोक्यात डाव्या बाजूला जोरदार मारला. यात संजिवनी कामतेकर यांना गंभीर दुखापत झाली. तसेच आरोपीने फिर्यादीला ठार मारण्याची धमकी देखील दिली, असे तक्रारीत नमूद आहे.


या घटनेची तक्रार राजापूर पोलीस ठाण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ११८(१), ३५२ (हल्ला), आणि ३५१(१) (इजा पोहोचवणे) अंतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक २०६/२०२५ नुसार गुन्हा नोंदवला आहे. जखमी फिर्यादी संजिवनी कामतेकर यांच्यावर उपचार सुरू असून, कौटुंबिक वादातून झालेल्या या गंभीर हल्ल्यामुळे दत्तवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *