ऑनलाइन तिकीट बुक करण्याच्या प्रयत्नात माहिती घेत असताना, एका अनोळखी व्हॉट्सॲप नंबरवरून आलेल्या लिंकवर क्लिक करणे रत्नागिरी शहरातील एका प्रौढाला चांगलेच महागात पडले आहे. ही लिंक उघडताच अवघ्या काही क्षणांत त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ९३ हजार रुपयांची रक्कम सायबर चोरांनी लंपास केली. अजित सदानंद पिलणकर वय ५०, रा. रत्नागिरी असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांनी या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
फसवणुकीची ही घटना ऑनलाइन तिकीट बुकिंगसंदर्भात माहिती घेण्याच्या वेळी घडली. तक्रारदार अजित पिलणकर हे तिकीट बुकिंगबाबत काही माहिती शोधत होते. याच दरम्यान, त्यांच्या मोबाइलवर एका अनोळखी व्हॉट्सॲप नंबरने अचानक एक लिंक पाठवली. ही लिंक तिकीट बुकिंगशी संबंधित असावी, या समजुतीने तक्रारदार यांनी ती लिंक उघडली आणि त्यामध्ये आवश्यक असलेली माहिती भरण्यास सुरुवात केली.
माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, काही वेळात तक्रारदार यांच्या बँक खात्यातून ९३ हजार रुपये कमी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, अजित पिलणकर यांनी तात्काळ हे प्रकरण गंभीरतेने घेत रत्नागिरी शहर पोलिसात धाव घेतली
आणि अनोळखी व्यक्तीविरुद्ध सायबर फसवणुकीची तक्रार दाखल केली.या प्रकरणामुळे रत्नागिरी शहरात ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार पुन्हा एकदा वाढू लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनोळखी नंबरवरून येणाऱ्या लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















