दापोली : हर्णे-राजवाडी येथे ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

banner 468x60

दापोली तालुक्यातील हर्णे-राजवाडी गावात काल ३० ऑक्टोबरच्या सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जयवंत भागोजी दुबळे (वय ८०) या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ८.३० वाजता नातू कौशिक संजय दुबळे (वय २५) हे नेहमीप्रमाणे आपल्या आजोबांना नाष्टा आणि चहा देण्यासाठी गेले असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांना आढळले. बराच वेळ आवाज दिल्यानंतर प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, स्वयंपाकघरात नायलॉन दोरीच्या सहाय्याने जयवंत दुबळे हे लटकलेले अवस्थेत आढळून आले.

त्यानंतर त्वरित त्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात अ.मृ. क्रमांक ७४/२०२५ प्रमाणे करण्यात आली असून बी.एन.एस.एस. कलम १९४ अंतर्गत पुढील तपास पोलीस हवालदार सडकर (ब.नं. १३०९) हे करीत आहेत. या घटनेने हर्णे-राजवाडी परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *