Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

राजापूरमधून तिघेजण बेपत्ता

banner 468x60

राजापूर तालुक्यातील तीन नागरिक गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता असून, त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. नागरिकांनी संबंधित व्यक्तींविषयी कोणतीही माहिती असल्यास ती जवळच्या पोलिस ठाण्यात कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सरस्वती जयराम लाड (वय ७०) राहणार हसोळतळी, लाडवाडी ता.राजापूर या त्यांच्या राहते घरातुन दिनांक १ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.३० वा.च्या दरम्याने हसोळतळी लाडवाडी ता.राजापूर जि. रत्नागिरी येथून नापत्ता झाल्या आहेत. त्यांची उंची ४ फुट ५ इंच, रंग गोरा, केस काळे पांढरे, बांधा-मध्यम, अंगात गुलाबी रंगाची नऊवारी साडी व गुलाबी रंगाच ब्लाऊज, गळ्यात काळ्या रंगाचा दोरा, उजव्या हाताच्या मनगटावर काळा डाग असे आहे. सुभाष यशवंत सौंदळकर वय-38 रा. आंगले सौंदळकरवाडी, ता.राजापूर हे ९ ऑगस्ट २०२४ रोजी ९ च्या दरम्याने आंगले सौंदळकरवाडी ता.राजापुर येथील त्यांच्या राहते घरातुन नापत्ता झाले आहेत. शिक्षण

– 10 वी ,जात-हिंदु कुणबी अंगाने – सडपातळ, चहेरा – उभट, उंची ५ फुट ८ इंच, रंग – सावळा, केस विरळ दाढी मिशी वाढलेली, अंगात राखाडी रंगाचे हाफ हाताचे टि शर्ट व राखाडी रंगाची हाफ पॅन्ट व पायात चप्पल, जवळपास मोबाईल नाही, भाषा मराठी, दारु पिण्याची सवय.पांडुरंग संभु सरवणकर वय ८६ वर्षे रा.मु.पो.केळवली खालची हर्याण वाडी, ता. राजापुर हे दि.२९ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वा. चे नंतर राहते घरातुन नापत्ता झाले आहेत. वर्ण – सावळा, उंची ५ फुट ६ इंच, केस बारीक पिकलेले, दाढी पिकलेली, चेहरा उभट, दात पडलेले, अंगात हाफ सफेद रंगाचे टि शर्ट व नेसणीस सफेद रंगाची फुल पँन्ट, पायात रेग्युलर चप्पल, हातात गोल्डन मनगटी घड्याळ, किशात आधार कार्ड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *