गुहागर : पालपेणे येथे अवैध खैर लाकूड करणारा टेम्पो वनविभागाच्या ताब्यात

banner 468x60

गुहागर तालुक्यातील पालपेणे येथे अवैधरीत्या खैर लाकडाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर वनविभागाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत बोलेरो टेम्पो आणि खैर लाकूड असा एकूण सुमारे सहा लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90

पालपेणे कुंभारवाडी येथे खैर लाकडाची चोरी होत असल्याची तक्रार सोन्या शिवराम पालकर यांनी दाखल केली होती. या तक्रारीनुसार गुहागर वनपरिक्षेत्रातील पथकाने तत्काळ कारवाई करत, विनापरवाना वाहतूक होत असलेला ४.३२० घनमीटर सोलीव किटा (खैर) आणि त्यासाठी वापरलेला बोलेरो टेम्पो (एमएच-०८-एपी-५२३६) असा माल ताब्यात घेतला.

जप्त खैर लाकडाची अंदाजित किंमत ₹१ लाख, तर टेम्पोची किंमत सुमारे ₹५ लाख आहे. दोन्ही वस्तू सध्या वनविभागाच्या ताब्यात असून, वाहनचालकाला चौकशीसाठी अटक करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी प्रकरण वनविभाग कार्यालय, चिपळूण येथे वर्ग करण्यात आले आहे.

या कारवाईदरम्यान पंचनामे व संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे. विभागीय वन अधिकारी (चिपळूण), सहायक वनसंरक्षक (चिपळूण) आणि परिक्षेत्र वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गुहागर आणि वनरक्षक अडूर यांनी ही प्रभावी कारवाई केली.

वनविभाग अवैध वृक्षतोड आणि तस्करीवर अंकुश ठेवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *