Breaking News
दापोलीच्या लाडघर समुद्रकिनाऱ्याला आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार; महाराष्ट्राचा प्रथमच जागतिक यादीत समावेश, लाडघरसह गुहागर आणि श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यांचाही गौरव, 15 नोव्हेंबरपासून ब्ल्यू फ्लॅग हंगामाला सुरुवात चिपळूण: दिवाळीतच खेर्डीकरांवर पाणीटंचाईचे संकट, सलग पाच दिवस पाणीपुरवठा विस्कळीत मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त

सांगमेश्वर : जिल्ह्यातील ग्रामीण भागाला नवी दिशा देणारा ‘कुणबी महोत्सव’ लवकरच; संस्कृती, कला आणि क्रीडा यांचा संगम

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण संस्कृतीला एक नवी ओळख आणि विकासाची नवी दिशा देण्यासाठी ‘कुणबी महोत्सव’ या अनोख्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ६ आणि ७ डिसेंबर रोजी संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे तर्फे देवळे येथील गोताडवाडी येथे हा महोत्सव संपन्न होणार आहे. संस्कृती, कला, क्रीडा आणि स्वाभिमान या चार स्तंभांवर आधारित हा महोत्सव ग्रामीण जीवनातील चैतन्य पुन्हा जागृत करणारा ठरेल असा विश्वास आयोजक सुहास खंडागळे,उदय गोताड यांनी व्यक्त केला आहे.

हा महत्त्वाकांक्षी महोत्सव आयोजित करण्यासाठी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे, अध्यक्ष उदय गोताड, आणि उपाध्यक्ष मंगेश घावडे यांनी पुढाकार घेतला आहे.

दोन दिवसांच्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. ६ डिसेंबर रोजी महोत्सवाचा श्रीगणेशा चित्रकला स्पर्धा, आकर्षक रांगोळी स्पर्धा आणि क्रिकेट स्पर्धांच्या उद्घाटनाने होईल. सायंकाळी ‘धमाल’ मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी उपस्थित जनसमुदायाचे मनोरंजन केले जाईल.

तर, महोत्सवाचा दुसरा दिवस, ७ डिसेंबर, अधिक सांस्कृतिक रंग घेऊन येणार आहे. या दिवशी नृत्य स्पर्धा, कुणबी संस्कृतीचे विशेष प्रदर्शन आणि अस्सल पारंपरिक मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून कुणबी समाजाची समृद्ध परंपरा, कला आणि क्रीडा क्षेत्रातील कौशल्ये एकाच व्यासपीठावर अनुभवण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण जीवनाला एक नवी उमेद आणि विकासासाठी एकजूट करण्याचे उद्दिष्ट या महोत्सवाच्या आयोजनामागे आहे, ज्यामुळे संगमेश्वरसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. करंबेळे येथील गोताडवाडी येथे होणाऱ्या या महोत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *