रत्नागिरी जिल्ह्यातील शिवाजीनगर येथील रिलायन्स मॉलच्या बाहेर सिद्धिविनायक नगर येथे नगर परिषदेच्या डंपरने दोन रिक्षांना ठोकर देऊन रिक्षांचे मोठे नुकसान केले आहे.
अपघातानंतर या डंपरने इलेक्ट्रिकच्या दोन खांबांना ठोकर देऊन साउथ इंडियन बँकेच्या गेट समोर ही गाडी धडकली. दुपारची वेळ असल्यामुळे सुदैवाने वाहतूक थोडी कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.
या ठिकाणी रिक्षा स्टॅन्ड असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात रिक्षा उभ्या असतात. मात्र अपघातवेळी केवळ दोनच रिक्षा याठिकाणी उभ्या होत्या. यामध्ये एका रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नगरपरिषदेच्या डंपरचे स्टेरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















