Breaking News
रत्नागिरी : रस्त्यावर फिट आल्याने 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू, उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली संगमेश्वर : मार्लेश्वर दर्शनाला आलेल्या सहा वर्षीय चिमुकलीचा दगड डोक्यात पडून मृत्यू, दोघे जखमी रत्नागिरी : डायलिसिस सेवा बंद करण्याचा प्रयत्न केल्यास कंपनीवर कारवाई करणार उदय सामंतांचा इशारा, रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही डायलिसिस केंद्रे सुरू राहणार चिपळूण : प्रशांत यादव यांच्या ‘स्वामिनी’ निवासस्थानी भाजपचा दिवाळी स्नेहमेळावा, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थितीखेर्डी येथे दिवाळी फराळाचे आयोजन, स्नेहबंध दृढ करत अनौपचारिक संवादातून साधला संवाद मंडणगड : केळवत घाटात दुचाकी आणि मारुती ब्रेझा कारची धडक, तिघे जखमी

चिपळुण : शेतात वीज कोसळून तरुणाचा मृत्यू, 8 जण जखमी

banner 468x60

चिपळूण तालुक्यात शेतात काम करणाऱ्या एका तरुणावर वीज कोसळून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना मुर्तवडे-बौद्धवाडी येथे आज बुधवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुशील शिवराम पवार (३८) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या दुर्घटनेत त्याच्यासोबत असलेले ८ जण जखमी झाले आहेत. या घटनेने चिपळुणात हळहळ व्यक्त होत आहे.

बुधवारी सायंकाळी अचानक वातावरण बदलले आणि विजांच्या जोरदार कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. शेतामध्ये भातकापणीच्या कामात व्यस्त असलेल्या शेतकरी आणि मजुरांवर हा ‘काळ’ अचानक कोसळला. मुर्तवडे-बौद्धवाडीच्या शेतात काम सुरू असताना वीज कोसळल्याने सुशील शिवराम पवार या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून, शेतात काम करणाऱ्या इतर आठ जणांना विजेचा धक्का बसून ते गंभीर जखमी झाले आहेत.

जखमी झालेल्यांमध्ये उत्तम भिवा पवार (५८), उर्मिला उत्तम पवार (52), रोशन रामदास पवार (14), सुजाता रामदास पवार (40), संचिता संदीप पवार (45), संदीप लक्ष्मण पवार (50) आणि सुलोचना नारायण कांबळे (37) संतोष विठ्ठल कांबळे (55) यांचा समावेश आहे. हे सर्वजण मुर्तवडे बौद्धवाडीचे रहिवासी आहेत.

त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भातकापणीच्या ऐन हंगामात व दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या विनाशकारी घटनेने मुर्तवडेवर मोठा आघात झाला आहे. सुशील पवार यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *