Breaking News
रत्नागिरी : रस्त्यावर फिट आल्याने 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू, उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली संगमेश्वर : मार्लेश्वर दर्शनाला आलेल्या सहा वर्षीय चिमुकलीचा दगड डोक्यात पडून मृत्यू, दोघे जखमी रत्नागिरी : डायलिसिस सेवा बंद करण्याचा प्रयत्न केल्यास कंपनीवर कारवाई करणार उदय सामंतांचा इशारा, रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही डायलिसिस केंद्रे सुरू राहणार चिपळूण : प्रशांत यादव यांच्या ‘स्वामिनी’ निवासस्थानी भाजपचा दिवाळी स्नेहमेळावा, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थितीखेर्डी येथे दिवाळी फराळाचे आयोजन, स्नेहबंध दृढ करत अनौपचारिक संवादातून साधला संवाद मंडणगड : केळवत घाटात दुचाकी आणि मारुती ब्रेझा कारची धडक, तिघे जखमी

चिपळुण : मद्यधुंद दुचाकी चालकामुळे अपघात, महिला गंभीर जखमी

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील खडपोली येथे बुधवारी (८ ऑक्टोबर २०२५) भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरून पडून कविता आशिष राऊत (वय ३५, रा. कोळकेवाडी) ही महिला जखमी झाली. या प्रकरणी दुचाकी चालकावर अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या नशेत आणि बेदरकारपणे गाडी चालवल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय विजय तांदळे (वय ३७, रा. अलोरे) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. ८ ऑक्टोबर रोजी विनय तांदळे हा मद्यपान करून आपली दुचाकी खडपोली ते अलोरे या मार्गावर भरधाव वेगाने चालवत होता. या दुचाकीवर त्यांच्यामागे कविता राऊत बसल्या होत्या.

खडपोली येथील मारुती मंदिराजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवरून दुचाकी आदळल्याने पाठीमागे बसलेल्या राऊत यांना वेगाचा अंदाज न आल्याने त्या रस्त्यावर कोसळल्या. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातासाठी बेजबाबदार आणि मद्यधुंद वाहन चालवण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल विनय तांदळे यांच्यावर अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *