दाभोळ ग्रामपंचायत सभागृह आणि वणौशी येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत दापोली कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणात सेंद्रिय शेतीची गरज व महत्व, महाडीबीटी योजना, शेती यांत्रिकीकरण, महाविस्तार ए.आय. तसेच इतर विविध शासकीय कृषी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. दापोली तालुका कृषी विभागासाठी शेतकर्यांसाठीच्या विविध योजनांच्या पूर्ततेसाठी ₹ 8.5 कोटीचा निधी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीविषयी सखोल मार्गदर्शन मिळाले. यावेळी उपस्थित शेतकर्यांनी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना महसुल खात्याकडून सहकार्य मिळत नसल्याचे सांगितले. त्यावर संबंधितांनी त्यावर योग्य तो पर्याय काढण्यात येईल असे सांगून आश्वासित केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमास उप कृषी अधिकारी हर्णे (उदय बंगाल), सहाय्यक कृषी अधिकारी कोळथरे (संजय जाधव) आणि सहाय्यक कृषी अधिकारी दाभोळ (शुभंकर यादव) तसेच दाभोळ पंचक्रोशीतील अनेक शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















