दापोली : नझीर इब्राहिम पठाण ‘मुस्लिम एज्युकेशन सोसायटी’च्या अध्यक्षपदी!

banner 468x60

नॅशनल हायस्कूल, दापोलीचे प्रशासन चालवणाऱ्या मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी नझीर इब्राहिम पठाण यांची निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शैक्षणिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

banner 728x90


​पठाण यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल त्यांचे पठाण आणि मुकादम फॅमिलीकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. नझीर इब्राहिम पठाण यांच्या नेतृत्वाखाली संस्था शिक्षण क्षेत्रात नवीन उंची गाठेल, असा विश्वास दोन्ही कुटुंबांनी व्यक्त केला आहे.


​यासोबतच, मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या संपूर्ण नवीन कार्यकारिणीलाही त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. नवीन कमिटी दापोलीतील शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


​शैक्षणिक विकास आणि संस्थेच्या प्रगतीसाठी नवनिर्वाचित अध्यक्षांचे आणि संपूर्ण कमिटीचे कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *