दाभोळ : येथील प्रसिद्ध कला दिग्दर्शक चंद्रशेखर बगाडे यांचं निधन

banner 468x60

दाभोळ गावातील सुपुत्र, उल्हासनगर येथे स्थायिक झालेले आणि आपल्या कलेच्या माध्यमातून लौकिक मिळवणारे प्रसिद्ध कला दिग्दर्शक चंद्रशेखर विष्णूपंत बगाडे (वय ७२) यांचे २६ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.


त्यांच्या निधनाने दाभोळ गावावर शोककळा पसरली आहे. प्रेमळ स्वभाव, कलात्मक दृष्टिकोन आणि मेहनतीने व्यवसाय उभा करणारे बगाडे यांनी बगाडे अ‍ॅण्ड बगाडे डेकोरेटर्स या नावाने स्वतंत्र ओळख निर्माण केली. अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामातून असंख्य लोकांची मने जिंकली.


दाभोळ ग्रामदेवीच्या शिमगोत्सवात आणि रंगपंचमी उत्सवात त्यांनी केलेल्या चलतचित्रांच्या सादरीकरणामुळे मिरवणुकीत नेहमीच उत्साह आणि रंगत भरली. गावाशी असलेली त्यांची नाळ आणि कलात्मक योगदान कायम स्मरणात राहील.


त्यांच्या निधनाची वार्ता कळताच गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. दाभोळ ग्रामदेवी ट्रस्टतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *