लांजा तालुक्यातील खालची कुंभारवाडी येथील रहिवासी किरण संजय चव्हाण (वय 27) या दि. 28 ऑक्टोबर 2024 रोजी सायं. 5 वाजता आपली मुलगी सृष्टी (वय 6) व मुलगा स्वराज (वय 4) यांच्यासह घरातून बाहेर पडल्या असून त्यानंतर तिघेही बेपत्ता झाले आहेत.
किरण चव्हाण यांची उंची सुमारे 5 फुट 4 इंच, गोरा रंग, उभट चेहरा, सरळ नाक, मध्यम केस असे वर्णन आहे. त्या नापत्तावेळी चॉकलेटी टॉप, पांढरा सलवार परिधान केलेल्या होत्या. त्यांच्या गळ्यात छोटे व मोठे सोन्याचे मंगळसूत्र, हार, कानात सोन्याच्या कुडी, नाकात नथनी, हातात हिरव्या काचेच्या बांगड्या, सोन्याच्या अंगठ्या तसेच पायात चांदीची जोडवी व पैंजण होते.
त्यांच्या सोबत चॉकलेटी रंगाची सॅक होती ज्यामध्ये कपडे व अंदाजे रु. 44 हजार रोख होते. कपाळावर लाल टिकली होती.
मुलगी सृष्टी हिची उंची 4 फुट, रंग गोरा, केस छोटे असून तिने चॉकलेटी टॉप व आकाशी लेगीन्स परिधान केले होते. मुलगा स्वराज याची उंची 3 फुट 4 इंच असून त्याने काळा टी-शर्ट व पॅन्ट परिधान केले होते. त्याच्या कानात सोन्याची एक बाली व पायात चप्पल होती.
नापत्ता महिला जवळ पांढऱ्या रंगाची अॅक्टीवा (MH-08 AR-0887) आहे.
या तिघांविषयी कोणाला माहिती मिळाल्यास संबंधितांनी जवळच्या पोलीस ठाण्यात त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















