राजापूर तालुक्यातील तेरवण बाईंगवाडी येथील जयश्री हरी जुवळे (२७) या तरुणीने राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत तरुणी मनोरुग्ण असल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली.
या प्रकरणी तारामती जुवळे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात खबर दिली. जयश्री जुवळे हिच्यावर रत्नागिरी येथील जिल्हा मनोरुग्णालयात उपचार सुरू होते. तेथील गोळ्या, औषधे सुरू होते.
दरम्यान बुधवारी दुपारी जयश्री ही घरी एकटीच असताना तिने नायलॉनच्या ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणाचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















