Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

खेड : 35 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

banner 468x60

खेड तालुक्यातील असगणी समर्थनगर येथील एका ३५ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. रिया राजेश जाधव असे मृत महिलेचे नाव असून, तिला उपचारासाठी कराड येथील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

banner 728x90


ही घटना १६ ऑगस्ट २०२५ रोजी घडली. रिया जाधव यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

कुटुंबातील सदस्यांना ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर, तिला तातडीने लोटे येथील परशुराम रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी तिला सातारा जिल्ह्यातील कराड येथील सह्याद्री रुग्णालयात हलवण्यात आले.


रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र १७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९.४५ वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *