Breaking News
रत्नागिरी : ऑनलाईन बँकिंग फसवणूक करणारे भामटे गजाआड, साखरी येथील ४.८२ लाखांच्या अपहारप्रकरणी मुसक्या आवळल्या; तांत्रिक तपासाला मोठे यश रत्नागिरी : हातखंबा येथे चार वाहनांची साखळी धडक; ट्रक क्लिनर गंभीर जखमी, महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प रत्नागिरी: कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या, उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या मंडणगड : बामणघरमध्ये जमीन घोटाळा, बाप लोकांनी जमिनीच्या मालकालाच लावला चुना, “पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीचा गैरवापर, 52 एकर जमीन लाटली, 41 लाखांचा घोटाळा उघड दापोली : एसटी स्टॅन्डजवळ इको गाडीतून बेकायदा दारू वाहतूक पकडली, 2.30 लाखांचा मुद्देमाल जप्त

चिपळूण : कोकणात जाणाऱ्यांसाठी गणेशोत्सवात स्पेशल मेमू, रेल्वे ५,६ आणि ७ सप्टेंबरला धावणार

banner 468x60

कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी गणेशोत्सवात स्पेशल मेमू सोडण्यात येणार आहे. ही रेल्वे ५, ६ आणि ७ सप्टेंबरला धावणार आहेत.

banner 728x90

गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांचा प्रवास अधिक सुकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी हा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव हा कोकणातील प्रमुख सण आहे.

या काळात लाखो नागरिक कोकणात येतात. अशावेळी रेल्वेचे तिकीटदेखील मिळणेही मुश्कील आहे. कोकणमार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलासा दिला आहे.

चिपळूण-पनवेल-चिपळूण या मार्गावर तीन दिवसांसाठी अनारक्षित मेमू विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चाकरमान्यांसह भाविकांना मोठा दिलासा आहे.

तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सावंतवाडी रोडदरम्यान आठ द्विसाप्ताहिक सेवांचा समावेश आहे. या रेल्वे २८ आणि ३१ ऑगस्ट, ४ आणि ७ सप्टेंबरला दोन्ही मार्गांवर धावतील. एलटीटी-सावंतवाडी विशेष सकाळी ८.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.२० वाजता पोहोचेल.

परतीचा प्रवास सावंतवाडी रोडवरून रात्री ११.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वा. एलटीटी येथे पोहोचेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *