Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

रत्नागिरी : खासगी बसमध्ये महिलेची छेडछाड, पण महिलेने तक्रारच केली नाही, बस पोलीस ठाण्यात

banner 468x60

खासगी बसमध्ये एका महिलेची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री घडला. या घटनेनंतर बसमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे बसचालकाने ती थेट रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात नेली.

banner 728x90


पोलिसांनी त्वरित चौकशी सुरू केली. मात्र, संबंधित महिलेने कोणतीही तक्रार दाखल केली नसल्यामुळे याप्रकरणी गुन्हा नोंदवला जाऊ शकला नाही.
सदर बस सिंधुदुर्ग येथून मुंबईच्या दिशेने निघाली होती. मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास सुरू असताना महिलेने बसमध्ये छेडछाड झाल्याची माहिती दिली. त्यामुळे बसमध्ये खळबळ उडाली.


घटनेनंतर बस रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आली. या वेळी अनेक तास बस पोलीस ठाण्यात उभी राहिली होती. मात्र महिलेकडून लेखी तक्रार न दिल्यामुळे पुढील कारवाई न करता बस मुंबईकडे रवाना करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *