Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

दापोली : येथून आई आणि मुलगी बेपत्ता

banner 468x60

दापोली तालुक्यातील लाडघर येथून आपल्या लेकरासहित एक माता बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

banner 728x90

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानसी गितेश मस्कर वय वर्ष 23 आणि श्रीशा गीतेश मस्कर वय वर्ष तीन या दोघी आपल्या माहेरी आईकडे विनया विलास घडवले लाडघर शंकरवाडी येथे राहण्यासाठी आल्या होत्या. मात्र २९ जून रोजी सायंकाळी चार वाजता चे सुमारास मानसी आपली मुलगी श्रीशा हिच्यासह कोणाला काहीही न सांगता लाडघर येथील आपल्या माहेरच्या घरातून बाहेर पडल्या त्या उशीरा पर्यंत कोठेही आढळून आल्या नाहीत .

संबंधितांकडे चौकशी करूनही त्यांची कोणतीही माहिती न मिळाल्यामुळे मानसी मस्कर यांच्या आई विनया विलास घडवले यांनी दिनांक ३० जून रोजी दापोली पोलीस स्थानक येथे आपली लेक आणि नात हरवल्याची तक्रार दाखल केली आहे .पोलीस तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *